news today, वैजापूरहून राजमाता जिजाऊ जन्मोत्सवसाठी रथ रवाना

वैजापूर ता.11 - जिजाऊ जन्मोत्सवनिमित्त वैजापूर येथून मराठा सेवा संघ प्रणित "राजमाता जिजाऊ माँ साहेब रथ" सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी (ता.11) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व जेष्ठ पत्रकार घन:श्याम वाणी
यांच्याहस्ते आरती, पूजन व श्रीफळ वाहून रथ सिंदखेडराजाला सकाळी सहा वाजता रवाना झाला. 

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या रथाचे पूजन, आरती व अभिवादन करताना धोंडीराम राजपूत,घनश्याम वाणी, मोती वाघ व घायवट

सोमवार (ता.12) रोजी सिंदखेडराजा या ठिकाणी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मोत्सवात हा रथ सहभागी होऊन वैजापूरचे प्रतिनिधित्व करणार आहे. शनिवारी (ता.10) मोतीभाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व महामान वांच्या पुतळ्याला अभिवादन व दीपप्रज्वलन करण्यात आले. रथ प्रस्थानसमयी आयोजक शिवश्री मोतीभाऊ वाघ, शिवश्री अण्णासाहेब घायवट, सौ.घायवट, योगेश बोर्डे, रथसारथी अशोक खैरे, फकिरराव गलांडे यांच्यासह बहुसंख्य शिव व जिजाऊ प्रेमी उपस्थित होते. हा रथ सायंकाळी सिंदखेडराजा येथे पोहचणार आहे व उद्या राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात वैजापूरचे प्रतिनिधित्व करणार आहे असे आयोजक मोती वाघ यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments