वैजापूर, ता.11 - वैजापूर नगरपालिकेत भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बहुमत मिळाले असून भाजपच्या गटनेतेपदी नगरसेविका जयश्री दिनेश राजपूत यांची तर प्रतोदपदी सविता शैलेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.
शनिवारी (ता.10) संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष संजय खबायते व डॉ .दिनेश परदेशी यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप ठोंबरे-पाटील ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, नगरसेवक विशाल संचेती, नगरसेवक राजेश गायकवाड, नगरसेविका ज्योतीताई जोशी, नगरसेविका संगिता राजपूत, लता वाणी, दिपा राजपूत, कविता शिंदे, मोनाली खैरे, श्रावण राजपूत, लिमेश वाणी, दिनेश राजपूत, शैलेश चव्हाण, विनोद राजपूत, गणेश खैरे, शैलेश पोंदे, प्रेमसिंग राजपूत, सागर राजपूत आदी उपस्थित होते.
0 Comments