news today, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होणे सुरू

मुंबई, ता.24 - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल सकाळपासूनच अनेक लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर बँक मॅसेज येण्यास सुरुवात झाली असून, महिलांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.

ज्या लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी संबंधित बँकेच्या शाखेत किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. ई केवायसी करतांना चुकीची माहिती दिल्याने अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला होता. यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. याची दखल घेत सरकारकडून लाडकी बहीण ई केवायसी पोर्टल सुरू करण्यात आले असून महिलांना आपल्या अर्जात 31 मार्चपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments