news today, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची 20 मार्चपूर्वी निवड करा - जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

वैजापूर, ता. 26 - राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडणुका 20 मार्चपूर्वी घेण्यात याव्यात, असे आदेश देणारे पत्र ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

छञपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणीसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी झाल्या. 9 तारखेला निकाल लागला. परंतु अद्यापपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची  निवड झालेली नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची नवनिर्वाचित सदस्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.
दरम्यान, ग्रामविकास विभागाने बुधवारी (ता.25) फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पात्र पाठविले असून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीसाठी 20 मार्चपूर्वी बैठका बोलाविण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments