काल बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाले आणि पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला.वैजापूर शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने चंद्रदर्शन झाले नाही. मात्र, छञपती संभाजीनगर येथील हिलाल कमिटीने चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी रात्री पहिल्या तरावीहची नमाज देखील अदा केली. तरावीह नमाजसाठी सर्वच मशिदींमधून व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी चंद्रदर्शनानंतर पहाटेच्या सहेरीच्या तयारीसाठी मुस्लिम बांधवांची धावपळ दिसून आली.
पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाल्याने शहरातील अनेक हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments