वैजापूर, ता. वैजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांचा मुंबई येथे सोमवारी (ता.16) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आ.रमेश पाटील बोरनारे, आ.विलास भुमरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी वैजापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले सुलतान साबेर खान, पारस घाटे, बाबासाहेब पाटील पुतळे, अमीर अली तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या श्रीराम गायकवाड, संगीता सुभाष तांबे, नीता दीपकसिंग राजपूत, पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले सुनील कदम, राहुल शेळके, वंदना शिंदे, भगवान साठे, अर्चना शेलार आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, बाबासाहेब पाटील जगताप, माजी आमदार अण्णासाहेब माने, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments