news today, वैजापूर पालिकेकडून मालमत्ता थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

वैजापूर, ता.02 - वैजापूर शहरातील मालमत्ता कर व पाणी पट्टी , गाळे भाडे व इतर नगर परिषदेचे  थकबाकी धारकांवर मुख्याधिकारी बी.यु बिघोत यांच्या निर्देशानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून जप्तीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहीम अंतर्गत सोमवारी (ता.02) शहरातील कै. बाळासाहेब पवार व्यापारी संकुलन येथील 3 दुकान गाळे सील करून नगर पालिकेच्या ताब्यात घेतले आहे.  तसेच एका गाळाधारकांने 4 लाख ररुपये थकबाकी भरणा केला आहे. पाणी पट्टी व घर पट्टी न भरणाऱ्या संबंधित घरांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.
   
जप्त करण्यात आलेल्या गाळ्यांना सील करताना नगरपालिकेचे कर्मचारी...

नगरपालिकेकडून वारंवार नोटिसा देऊनही काही नागरिकांनी थकबाकी न भरल्याने अखेर ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात. आले. शहरातील विविध प्रभागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून थकबाकीदारांची यादी तयार करून टप्प्याटप्प्याने नळ कनेक्शन तोडण्यात येत आहेत. तसेच, गाळेधारकांकडूनही गाळे भाडे /न. प. जागा भाडे ज्या गाळे धारकाकडे थकबाकी आहे  असे सर्व दुकान गाळे जप्त करण्यात येईल या बाबत प्रशासनाने गाळेधारकांना पूर्वसूचना देण्यात आली आहे.असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
     
मुख्याधिकारी बी.यु बिघोत यांनी शहरातील सर्व मालमत्ता कर व पाणी पट्टी , गाळे भाडे व इतर नगर परिषदेचे  थकबाकी धारकांना जाहीर आवाहन करून त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून नगर पालिकेस सहकार्य करावे व जप्तीची कटुता टाळावी.  तसेच पाणी पट्टी थकबाकीदारांनी तत्काळ त्यांच्याकडील थकबाकी भरल्यास पाणी कनेक्शन पुन्हा सुरू करून देता येईल व सील केलेले गाळे उघडण्यासाठी त्यांच्याकडे थकबाकी भरावी व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
     
                                                                                                                                                       
     

Post a Comment

0 Comments