news today, पंचायत समिती सभापती व उपसभापतींची 10 मार्चला निवड

वैजापूर, ता.02 - छञपती संभाजीनगर जिल्हयातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड येत्या 10 मार्च रोजी होणार आहे. यासाठी सभा बोलाविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत. यासाठी पीठासीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्हयातील वैजापूर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती (महिला) उमेदवारासाठी राखीव असून उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सिल्लोड व कन्नड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असून याठिकाणी उपजिल्हाधिकारी निलेश अपार व उपविभागीय अधिकारी संतोष गोरड हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. फुलंब्री पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून येथे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना या पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.  

खुलताबाद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), छञपती संभाजीनगर व गंगापूर सर्वसाधारण, पैठण सर्वसाधारण महिला या सोयगांव ईतर मागासवर्गीय प्रवर्ग राखीव असून खुलताबादला उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, छञपती संभाजीनगरला व्यंकट राठोड, गंगापूरला उपजिल्हाधिकारी विजय राऊत, पैठणला जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तर सोयगांवला उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments