news todaay, वैजापूर येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक अभिवादन 

वैजापूर ता. 11 - शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. शिव-फुले-शाहू - आंबेडकर समिती व नागरिकांच्यावतीने शनिवारी (ता.11) येथील महात्मा फुले पुतळा परिसरात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..


आमदार रमेश पाटील बोरनारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पालिका नगरसेवक, विविध संस्थाचे पदाधिकारी, शिव- फुल-शाहूं -आंबेडकर समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, डॉ.प्रीती भोपळे, बाबासाहेब गायकवाड, दौलत गायकवाड, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, शैलेश पोंदे, गिरीश चापानेरकर, ज्ञानेश्वर टेके, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.

या प्रसंगी वैष्णवी कविता अशोक देवकर या मुलीने महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. देशभक्तीपर व सामाजिक,धार्मिक गीते आपल्या बँड पथकाद्वारे चाऊस ब्रास बँड यांनी सादर केली. शिव- फुले -शाहू -आंबेडकर समितीच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. 



 

Post a Comment

0 Comments