news today, उपनगराध्यक्ष हाजी अकील सेठ यांच्या पत्नी नौशाद बी याचे दीर्घ आजाराने निधन

वैजापूर, ता.11- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील सेठ यांच्या पत्नी नौशाद बी (वय 64 वर्ष) याचे दीर्घ आजाराने शनिवारी (ता.11) दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले. रात्री 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
                                  नौशाद बी 

गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्या आजारी होत्या.  छञपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना वैजापूर येथील शेळके हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कर्करोगाशी झुंज देत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या ओळखल्या जात. वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी अकील सेठ यांच्या त्या पत्नी व विद्यमान उपनगराध्यक्ष शेख रियाज यांच्या त्या आई होत. रात्री 9 वाजता नौगाजी बाबा दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये त्यांचा अंत्यविधी होणार आहे. 

Post a Comment

0 Comments