news today, येवला टोल नाक्यावर पोलिस - ट्रक चालकात एन्ट्रीवरून वाद सिगारेट फेकल्याने ट्रक जळून खाक

येवला टोलनाक्यावर धक्कादायक प्रकार ...

येवला, ता.10 - नाशिक जिल्ह्यातील येवला टोलनाक्यावर ‘नो एन्ट्री’वरून पोलीस आणि आयशर ट्रकचालक जगतार सिंग यांच्यात जोरदार वाद झाला. चालकाने कथित लाचेची मागणी फेटाळल्यामुळे वाद चिघळला. यानंतर झालेल्या झटापटीत एका पोलीस कर्मचाऱ्याने फेकलेल्या सिगारेटच्या ठिणगीमुळे ट्रकला भीषण आग लागली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेल्या एसी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने काही क्षणातच ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे पोलीसांच्या वर्तणुकीवर संताप व्यक्त केला जात असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments