news today, जरूळ फाट्याजवळ कार दुचाकीची धडक ; एकजण ठार

वैजापूर, ता. 07 - भरधाव कार व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना  वैजापूर - खंडाळा मार्गावरील जरूळ फाट्याजवळ मंगळवारी (ता.07) सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर एकनाथ पठाडे (58 वर्ष रा.सवंदगांव ता.वैजापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

.              अपघातात मृत पावलेले ज्ञानेश्वर पठाडे 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पठाडे हे आपल्या दुचाकीने सवंदगाव येथे जात असताना रस्त्यात जरुळ फाटा येथे त्यांच्या दुचाकीची भरधाव कार सोबत धडक झाली. या अपघातात पठाडे हे गंभीर जखमी झाले. वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते वाहेद पठाण यांनी जखमी पठाडे यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी ज्ञानेश्वर पठाडे यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळतात वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे .

Post a Comment

0 Comments