वैजापूर, ता.26 - दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच गतप्राण झाल्याची घटना रविवारी (ता.26) एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास येवला रस्त्यावरील पालिकेच्या जलतरण तलावासमोर घडली.
नीतेश पोपटलाल देसाई (वय 48 वर्ष, रा.विनायक कॉलनी, वैजापूर ) असे अपघातातील मृताचे नाव आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, नीतेश देसाई हे रविवारी सकाळी आठ वाजता पालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी दुचाकीवरून येवला रस्त्याने जात होते. नेमके याचवेळी वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील डॉ. प्रतीक दोडकर हे देखील दुचाकीवरून त्याच दिशेने जात होते. दरम्यान पालिकेच्या जलतरण तलावासमोर पोहचताच नीतेश यांनी जलतरण तलावकडे वळण घेतले. मात्र काही समजण्याच्या आत मागील बाजूने येणाऱ्या डॉ. दोडकर यांच्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अन् या अपघातात देसाई जागीच गतप्राण झाले. या धडकेत प्रतीक गंभीर जखमी झाले.
0 Comments