फळ पीक विमा योजनेला चार दिवसांची मुदतवाढ
मुंबई - हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत केंद्र सरकारने वाढवून दिली आहे.आता शेतकऱ्यांना आणखी चार दिवस म्हणजे 6 जुलैपर्यंत विमा योजनेसाठी अर्ज करता येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या योग्य समन्वयामुळे फळपीक विमा काढण्यासाठी वाढीव मुदत मिळाल्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा, कापूस, मका, तूर, सोयाबीन, बाजरी, मूग या पिकांसाठी वरीलप्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार आहे.
हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिवस 30 जून होता, मात्र 27 जूनपासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधल्यानंतर 6 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
0 Comments