कीर्तनकार संगीताताई पवार या मागील दोन महिन्यापासून चिंचडगांव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमात वास्तव्यास होत्या..त्या बाहेर झोपलेल्या असताना चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचे उघकीस आले आहे. गुन्ह्यातील आरोपी हे परप्रांतीय असून दोघानाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष जगन चौहान (उर्फ भायला) व अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला (रा. मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मध्यप्रदेशातील असून मजुरी करण्यासाठी ते आले होते.
यातील संतोष उर्फ भायला याला मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अनिल उर्फ हाबडा यास मध्यप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे
हा गुन्हा उघडकीस आणण्यात एका पोलिस पाटलाने मदत केली आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या बघितल्यावर पोलिस पाटील बाळकृष्ण सामसे यांना संशयित गावात बघितल्या सारखा वाटला. त्यांनी याबाबत वीरगाव पोलिसांना संपर्क साधत माहिती दिली. वीरगाव पोलिसांनी या प्रकरणात आरोपीची ओळख पटवली आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, बाम्हदे व पंडुरे यांनी आरोपीला गोपनीय बातमीच्या आधारे अटक केली. हा आरोपी गाढेपिंपळगाव येथे गेल्या सात ते आठ दिवसापासून मजुरी काम करत होता..
प्राथमिक तपासणीत ताब्यात घेतलेल्या दोघां आरोपींनी चोरीच्या उद्देशानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक डॉ.विनय कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments