छत्रपती संभाजीनगर, ता.2/ प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील आठशे सत्तर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या सात जुलैला काढण्यात येणार आहे. 2025 ते 30 या पाच वर्षाच्या कालावधीसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून सर्व तालुक्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.यासंदर्भात सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले आहेत.
6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार राज्य सरकारने 13 जूनला अधिसूचना काढली तसेच एप्रिल महिन्यात काढलेली आरक्षण सोडत रद्द करून सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत.त्यानुसार आता सात जुलैला सर्व तालुक्यात मुख्यालयाच्या ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
0 Comments