वाजत गाजत, गुलाल उधळत या...
उद्धव - राज ठाकरे यांचे मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
मुंबई - हिंदी सक्ती विरोधातील मराठी माणसाचा एल्गार यशस्वी झाला. त्याचा विजयोत्सव येत्या शनिवारी वरळीत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना संयुक्तपणे साजरा करणार आहे. या जल्लोष मेळाव्यासाठी वाजत गाजत,गुलाल उधळत या,असे संयुक्त आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे.
येत्या शनिवारी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुल येथे सकाळी दहा वाजता जल्लोष मेळावा होणार आहे.मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल अठरा वर्षांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. विशेषतः ठाकरे बंधू केंव्हा एकत्र येणार ? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला य या निमित्ताने निकाली निघाला आहे. पहिल्यांदाच दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनाद्वारे मराठी जनतेला या मेळाव्यासाठी वाजत गाजत, गुलाल उधळत येण्याचे आवाहन केले आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी संयुक्त बैठका...
मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकाही होत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत,अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर,अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या निमंत्रणात राज ठाकरे यांचे नाव आधी व नंतर उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे निवेदन प्रसिध्द केले आहे.
0 Comments