today news, आ.रमेश बोरणारे यांनी विधानसभा अधिवेशनात मांडले विविध विकास प्रश्न

आ.रमेश बोरणारे यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला जिल्हयातील विविध विकास प्रश्न व समस्यांचा पाढा 

वैजापूर, ता. 2 / प्रतिनिधी - ऐतिहासिक, सांस्कृतिक  व औद्योगिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हयाचा राज्यातील पाच महत्वाच्या जिल्हयात समावेश होतो. त्यामुळे त्यातील भौतिक सुविधेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येतो. यासंदर्भात आ. रमेश पाटील बोरणारे यांनी विधानसभा अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित केले व पायाभूत सुविधा जिल्ह्यात निर्माण झाल्या तर त्यातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासात भर पडेल असे मत अधिवेशनात मांडले.
 
आ.बोरणारे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढती ट्रॅफिक व औद्योगिकरण लक्षात घेता मुंबई, पुणे, नागपूरच्या धर्तीवर मेट्रो (रेल्वे) सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगून कित्येक वर्षापासून ज्याची नागरिकांना अपेक्षा आहे असे शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज एमआयडीसी पर्यंत 22 कि.मी. पर्यंत उड्डाणपूल सुरू झाल्यास शहरातील नागरिकांना होणारा ट्रॅफिकचा त्रास कमी होऊन मोठ्याप्रमाणावर वेळेची बचत होईल व दोन्ही एमआयडीसी प्रत्यक्षरित्या जोडल्या जातील व त्यातून औद्योगिकरण व जनसुविधेत भर पडेल त्यामुळे मेट्रो चालू करावी अशी मागणी  केली..         
 छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते शिर्डी विमानतळ हा संपूर्ण रस्ता चार पदरी करावा जेणे करून दोन्ही शहरे एकमेकांना जोडले जाईल व बरीच आंतरराष्ट्रीय उड्डाणे हे शिर्डी विमानतळावरून होत असल्याकारणाने संभाजीनगरहून शिर्डीत जावे लागते. त्याचबरोबर वाळूज एमआयडीसी ते आरापूर एमआयडीसी समृद्धी महामार्गाशी जोडल्या जाईल. 

छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर - येवला मार्गे नाशिक चार पदरी रस्ता झाल्यास दोन्ही जिल्हे एकमेकांना जोडले जातील त्यातून दळणवळण तसेच कुंभमेळा व गोदातीरावरील उत्तरकार्यसाठी भाविक व प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल तसेच आरोग्याच्यादृष्टीने जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामधून व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हयातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात वाढत्या रुग्णसंख्येमुळे घाटी रुग्णालयाचा  विस्तार होणे गरजेचे आहे व त्यासाठी मोठी इमारत उभारण्यात यावी ज्यातून सर्वसामान्य रुग्णांना तत्काळ सुविधा उपलब्ध होतील. आदी मागण्या आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी आपल्या प्रस्तावात मांडल्या.

Post a Comment

0 Comments