गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त
विनपारवाना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे बाळगणाऱ्या एकास वैजापूर पोलिसांनी साफळा रचून वैजापूर कोपरगाव रस्त्यावरील हॉटेल शेतकरीमध्ये पकडले. ही कारवाई बुधवारी (ता.09 जुलै) रोजी करण्यात आली. शुभम अनिल बाहेती (वय 25 वर्ष, राहणार मुळे गल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहेत.
शेतकरी हॉटेलमध्ये एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद असून त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ताईतवाले व त्यांच्या पथकाने शेतकरी हॉटेल येथे साफळा लावला असता तो हॉटेल बाहेर येत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस अंमलदार किरण गोरे, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, अविनाश भास्कर, प्रशांत गीते, अजित नाचन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments