news today, वैजापूर पालिकेच्या जलतरण तलावाच्या गेटजवळ बेशुद्धावस्थेत मिळून आलेल्या तरुणाचा मृत्यू

मृत व्यक्तीबाबत माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन 

आवेज खान 
वैजापूर, ता. 30 - शहरातील वैजापूर ते येवला रोडवर असलेल्या नगरपालिका जलतरण तलावाच्या प्रवेशद्वारासमोर  समोर दिनांक  24/07/2025 रोजी 25 त30 वर्ष वयाचा एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत  मिळून आला. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते.  उपचार दरम्यान दिनांक 29 जुलै रोजी सदर मयत झाला आहे.
मयत हा अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा अनोळखी व्यक्ती असून  त्याच्या छातीवर आनंदाबाई असे नांव गोंदलेले आहे. उजव्या हातावर मराठीत '' गोंदलेले असून डाव्या हाताच्या मनगटावर ❤️ दिलचे  चित्र गोंदलेले आहे. त्याने भुरकट रंगाची पॅन्ट घातलेली आहे. त्याची उंची अंदाजे 170 सेंटीमीटर असून तो सडपातळ आहे. या वर्णणाचा व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत मिळून येऊन मयत झाला आहे. 
     वरील वर्णनाच्या अनोळखी व्यक्तीबाबत काही माहिती  असल्यास तात्काळ वैजापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब मो..नंबर. 9309540056 , पोलिस अंमलदार पैठणकर  मो.न.9284156153 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments