अखंड हरिनाम सप्ताह स्थळी भजन भक्तीने पांडुरंग अवतरेल -- महंत रामगिरी महाराज .
वैजापूर, ता.30 / प्रतिनिधी - वारकरी संप्रदायाचा महा कुंभ समजला जाणारा 178 वा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज बुधवार ता.30 जुलै रोजी बाजाठाण आशुतोष महादेव मंदिर या ठिकाणाहून सकाळी दहा वाजता सजविलेल्या अश्वरथातून गोदाधाम सराला बेटाचे अधिपती महंत रामगिरी महाराज यांची हात्ती,घोडे,उंट, ढोलताशा, लेझिम व झांज पथकाच्या गजरात सनई- चौघड्याच्या निनादात गावातील भजनी मंडळाच्या सुश्राव्य अभंगवाणीत टाळ मृदुंगाच्या गजरात सप्ताहस्थळापर्यंत भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघाली होती .
यावेळी रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे चित्ररथातून चक्रधर स्वामी लीला चरित्र, ज्ञानेश्वरीचा पैस खांब, संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन , विठ्ठल रुक्मिणी चित्ररथ विठु माझा लेकुरला चित्ररथ ,नवनाथाचे तैलचित्र,श्रीराम लक्ष्मण हरीणवध देखावा अशा वेगवेगळ्या समाजप्रबोधन देखावे,सप्तक्रोषी ग्रामस्थांचे व विविध शाळेतील, महाविद्यालय विद्यार्थ्यांचे देखावे हे भाविकांचे आकर्षण होते . शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समाज प्रबोधनात्मक देखावे व पथनाट्यांचे सादरीकरण सप्तक्रोषी ग्रामस्थ यांच्या नियोजनातून करण्यात आले. मिरवणूक मार्गावर सप्तक्रोशी गोदातीरी शिवारातील माळरानावर कलशधारी सुवासिनी,तुळशीवृंदा महिला,संतमेळा व सहभाग ठोलपथकांचा रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला .
मिरवणूक भजन मंडपात पोहचताच महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड यज्ञ प्रज्वलित करून ,सद्गुरु गंगागिरी महाराज ,ब्रम्हलिन नारायणगिरी, संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संताच्या प्रतिमाचे पुजन , विणापुजन करुन पंचपदी गायनाने अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले की,अखंड हरिनाम हा तपस्या यज्ञच असुन गंगागिरी महाराज हे निष्काम सन्याशी होते,त्यांच्या परंपरेतील हे कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेत आहोत,अहोरात्र 11,000 हजार टाळकर्याच्या ऊपस्तीत 168 तास अखंड भजन पाहील्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्या शिवाय रहाणार नाही , फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे .सद्गुरुच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी महाराजांनी केली ..
पहिल्याच दिवशी मांडे व पुरणपोळीचा महाप्रसाद- सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहात दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी कोपरगाव,येवला,नांदगाव, श्रीरामपूर वैजापूर गंगापूर व सप्ताह सप्तक्रोशितील गावानी मांडे व पुरणपोळी लक्ष्मी माता दुध संकलन चे बाबासाहेब पा चिडे, केशव पाटील शिदे मित्र परिवार कडुन दुध जवळपास 2 ते 3 लाख भाविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसगी कुषीमंत्री माणिकराव कोकाटे साहेब, आमदार रमेश पा बोरणारे, माजी सभापती अविनाश पाटील गंलाडे, बाबासाहेब चिडे, बाळासाहेब कापसे , वंदना मुरकुटे, राम दरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे सदिपान महाराज, योगेन्द्गगिरी महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज, सरला संस्थान मधील सर्व महाराज मंडळी भजनी मडळीसह जवळपास सुमारे 2 ते 3 लाख भाविकाची उपस्थिती होती.
---------------------------------------------------------------------------
भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी आणि कृषी संस्कृतीला विशेष महत्त्व असून योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या प्रत्येक सप्ताह मध्ये भव्य असे कृषी प्रदर्शन भरवल्या जाते यामध्ये देश विदेशातील माहिती तंत्रज्ञान विविध शेती अवजारे शेतातील विविध प्रयोग पाहण्यास मिळतात या प्रदर्शनाचं आजपासून प्रारंभ या ठिकाणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,, रमेश पा बोरणारे सर यांच्या हस्ते करण्यात आला. आज पासून हे प्रदर्शन सुरू राहील अशी माहिती सप्ताह कमिटीच्या वतीने देण्यात आली.
---------------------------------------------------------------------------
0 Comments