वैजापूर, ता.12/प्रतिनिधी - वैजापूर शहरातील संभाजीनगर कॉलनी येथे विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागअंतर्गत मंजूर असलेल्या 1 कोटी 50 लाख रुपये निधीच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी (ता.12) पार पडला.
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्टयपूर्ण योजनेतून वैजापूर शहरातील संभाजीनगर कॉलनीतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी विशेष प्रयत्न करून मंजुर करून 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला होता. या रस्त्याच्या कामाचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष साबेरभाई, मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, खुशालसिंग राजपूत, माजी सभापती संजय पाटील निकम, सभापती रामहरीबापू जाधव, डॉ.राजीव डोंगरे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, भाजप तालुकाध्यक्ष नारायण पाटील कवडे, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शहरप्रमुख पारस घाटे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अशोक पातील देवकर, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयमालाताई वाघ, संचालक कल्याण पाटील दांगोडे, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, महिला आघाडीच्या शहरप्रमुख.सुप्रिया व्यवहारे, सुनीताताई साखरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस
दशरथ बनकर, डॉ. निलेश भाटिया, कय्युमशेठ सौदागर, हमीदशेठ कुरेशी, बशीरशेठ सौदागर, खलील मिस्तरी, माजी उपसभापती आनंद निकम, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, भाजपाचे गौरव दौडे, महेश पाटील बुनगे, रावसाहेब पाटील मोटे, प्रशांत पाटील शिंदे, ज्ञानेश्वर घोडके, डॉ. संतोष गंगवाल, कमलेश आंबेकर, कपिल खैरे,, बाळासाहेब जाधव, वसंत त्रिभुवन यांच्यासह नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments