वैजापूर, ता .12/ प्रतिनिधी- - भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला.ही घटना वैजापूर गंगापूर रस्त्यावर शहराजवळील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (ता.11) सकाळी घडली.
सागर भाऊसाहेब नरवडे (30 वर्ष) रा.कन्नड असे मयत युवकाचे नाव आहे. सागर नरवडे हा वैजापूर येथे आजीला भेटण्यासाठी आला होता.आजीला भेटून तो रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (एच. आर. 37 ई. 0159) त्याला जोराची धडक दिली. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फौजदार रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक दुर्गेश कमश विश्वकर्मा (रा. उत्तर प्रदेश) याच्या विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments