today news, वैजापूर तालुक्यातील जरुळ येथे निर्मला इन्स्टिट्यूटतर्फे महिला सक्षमीकरण कार्यक्रम

प्रभावी प्रशासन आणि सर्वांगीण विकासासाठी महिला
सक्षमीकरण आणि नेतृत्व काळाची गरज
- धोंडीरामसिंह राजपूत

वैजापूर ता.12 / प्रतिनिधी -
स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन अधिक प्रभावी व कार्यक्षम करून शहर व गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील जरूळ येथे निर्मला इन्स्टिट्यूट मार्फत आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात केले.
ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता.12) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की," ग्रामसभा"ही लोकशाहीचा आत्मा समजल्या जात असून ग्रामसभा नियमित व्हाव्यात व त्यात गावातील पुरुष व महिलानी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे. गावाच्या गरजांचे ठराव घेऊन ते मंजूरीस्तव वरिष्ठांना पाठवून कार्यान्वित करावे असे राजपूत म्हणाले.  

याप्रसंगी गावच्या सरपंच शोभाबाई सदाशिवराव मतसागर यांचे प्रतिनिधी देविदास मतसागर, उपसरपंच परसराम दामू बागुल, सदस्य अनिल बागुल, रोहिदास बागुल.यांच्यासह निर्मला इन्स्टिट्यूटच्या मार्गारेट रॉड्रिक्स, तारिका इक्का, छाया बंगाळ यांच्यासह गावकरी व शालेय विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक निर्मला इन्स्टिट्यूटच्या मार्गारेट यांनी केले. महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहुन सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक पी. टी.तांबे, श्री.पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
.शेवटी देविदास मतसागर यांनी आभार मानले.
.

Post a Comment

0 Comments