today news, नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्टला प्रसिध्द होणार ; 21 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना

शासनाचे आरक्षण सोडतीबाबत अद्याप निर्देश नाहीत 


वैजापूर, ता.13/प्रतिनिधी - 
राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तीन वर्षांपासून जिल्हयातील नगरपालिकांचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. कधी कोरोनाच्या संसर्गाचे कारण देत, तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी निर्णय दिला. ओबीसींना 2022 पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेऊन चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे.

नगरपरिषद प्रभाग रचनेचा कार्यक्रम
राज्य शासनाने 12 जून 2025 रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता, त्यात आता बदल करण्यात आला असून, प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम नगरविकास विभागाने 23 जून रोजी जाहीर केला आहे.त्यानुसार 18 ऑगस्टला  नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे.
प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे - 18 ऑगस्ट 
प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती.       21ऑगस्टपर्यंत 
प्राप्त हरकतींवर सुनावणी.             22ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे -   26 ते 30 सप्टेंबर
असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. शासनाने मात्र अद्यापही आरक्षण सोडतीबाबत निर्देश दिलेले नाही.
नगरपरिषदेची प्रभाग रचना मुख्याधिकारी यांच्याकडून केली जाईल.प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी नगरविकास विभागाला सादर करतील .प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाकदून मान्यता मिळाल्यानंतर ती प्रसिध्द करणे आणि त्यावर हरकती,सूचना विचारात घेऊन सुनावणी घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. अंतिम प्रभाग रचना मुख्याधिकारी प्रसिध्द करतील.

Post a Comment

0 Comments