छत्रपती संभाजीनगर, ता.13 / प्रतिनिधी -
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा पालकमंत्री ना. संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.12) घेण्यात आला.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात ही बैठक पार पडली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी सुरू असून ज्यांच्याकडे वैध परवानगी आहे, त्यांचे हक्क राखले जातील. आवश्यक ठिकाणी संयुक्त मोजणी करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात येतील. अतिक्रमण काढल्यावर तात्काळ रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत, विजेचे खांब हटवावेत आणि आवश्यक तेथे भूमिगत वीज वाहिन्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले.
या मोहिमेमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
या बैठकीस मंत्री अतुल सावे, आमदार, संजय केणेकर, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार.अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 Comments