वैजापूर, ता. 13 / प्रतिनिधी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झळकली आहेत. ही केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.म्हणून मराठी अस्मितेच्या या ऐतिहासिक क्षणानिमित्त रविवारी (ता.13) भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वैजापूर येथे जल्लोष साजरा केला.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश राऊत, भाजपचे राज्य परिषद सदस्य प्रशांत नाना कंगले, जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष जयमाला वाघ, दक्षिण मंडळ अध्यक्ष संदिप ठोंबरे, केतन आव्हाळे नगरसेवक दिनेश राजपूत , गणेश खैरे, सुनील गायकवाड, सुरेश तांबे, सोनू राजपूत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष अनिताताई तांबे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष गौरव दोडे, ज्ञानेश्वर शिरसाट, नासेर शेख, महेश भालेराव, आकाश शिंदे, आकाश बागुल, प्रशांत बावचे , सुनील साठे आदींसह भाजप महिला मोर्चा व युवा मोर्चा व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments