today news, तलवाडा येथे संत बहिणाबाई समाधी संस्थेच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त बैठक

जिथे काही कमी, तेथे आम्ही” – आमदार रमेश बोरनारे यांची भाविकांना ग्वाही

वाल्मीक जाधव
--------------------------
शिऊर ता .13 -  वैजापूर व गंगापूर विधानसभा मतदारसंघातील शनिदेवगाव, तलवाडा आणि हिलालपूर या तिन्ही गावांतील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने “जिथे काही कमी पडेल, तेथे आम्ही आहोत” अशी ग्वाही आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे त्यांनी दिली. तसेच या धार्मिक सप्ताहासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.

तलवाडा येथे रविवारी (दि. १३) संत बहिणाबाई समाधी संस्थेच्या वतीने आयोजित ४६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या अनुषंगाने ध्वजारोहण ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, शांतिपुष्प ह.भ.प. जयराम महाराज गोंडेगावकर, ह.भ.प. मधुसूदन महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी विधीव्रत संत प्रतिमांचे पूजन आणि ध्वजारोहणाने सप्ताह कार्यास एकप्रकारे अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला परिसरातील ५० हून अधिक गावांमधून वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मंडळी आवर्जून उपस्थित होते हेही विशेष. तसेच कृ.उ.बाचे माजी सभापती संजय पाटील निकम, डॉ. राजीव डोंगरे, अभय पाटील चिकटगावकर, अविनाश पाटील गलांडे, एकनाथ जाधव, सारंगधर महाराज भोपळे, पंढरीनाथ महाराज पगार यांनी हजेरी लावून आगामी सप्ताहाला शुभेच्छा दिल्या.

तर मधुसूदन महाराज यांनी भाषणात सांगितले की स्वर्गीय काशिनाथ महाराज मोगल यांनी १९९२ मध्ये सप्ताहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेने आम्ही हे कार्य पुढे नेत आहोत. आज हा सप्ताह ४६ व्या वर्षात पदार्पण करत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने सुरेगाव (ता. नेवासा) येथील ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी “बहिणी म्हणे फडकती ध्वजा” या उक्तीचा संदर्भ देत, बहिणाबाईंच्या कार्याची आठवण करून दिली. तसेच श्रावण महिन्यातील हा अखंड हरिनाम सप्ताह देवगाव रंगारीपासून ते शिऊरच्या पवित्र स्थळी कसा पोहोचला आहे या भक्तीमय मार्गाचा विस्तार व्यक्त केला. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राजेंद्र मगर यांनी केले. तर आसाराम बोडके, अजय पाटील चिकटगावकर, दशरथ बनकर, ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र चव्हाण, भरत साळुंखे, राजेंद्र काटे, प्रल्हाद जाधव, अशोक मगर,  प्रा. आनंद मगर, मच्छिंद्र माळी, शांताराम मगर, जनार्दन मगर, डॉ. अर्जुन साळुंखे, उत्तम निकम, रिखबचंद पाटणी, भगवान घोगरे आदींसह अनेक जण यावेळी उपस्थित होते. आभारप्रदर्शन भागिनाथ दादा मगर यांनी करत भाविक व हितचिंतकांनी सप्ताहासाठी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments