Today news, वैजापूर तालुक्यातील चांडगांव येथे 33/11 केव्ही सब स्टेशन व एचटी लिंक लाईन कामाचे आमदार बोरणारे यांच्याहस्ते लोकार्पण



आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाने 2 कोटी 34 लाख रुपयांचा निधी 

 वैजापूर, ता.26 / प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथे  33/11 केव्ही सबस्टेशन व एचटी लिंक लाईनसाठी 2 कोटी 34 लाख रुपये निधीच्या कामांचे लोकार्पण शुक्रवारी (ता.25) आमदार रमेश  पाटील बोरणारे यांच्याहस्ते संपन्न झाले. 
.
तालुक्यातील चांडगाव, पानवी खुर्द, पानवी.खंडाळा व नांदगाव हे चारही गावें  वैजापूर" सब स्टेशन येथील फिडरवर असल्याने त्यावर जास्त भार निर्माण होऊन विद्युत पुरवठा वारंवार खंडीत  होत होता. त्यासाठी गावकर्‍यांच्या मागणीनुसार आ. बोरणारे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व ही चार गांवे  वैजापूर फिडरपासून वेगळे करून नवीन चांडगाव 33/11 केव्ही सब स्टेशन व एचटी लिंक लाईनसाठी  2 कोटी 34 लाख रुपये निधी मंजूर करून आणला.
शेतकर्‍यांनी खूप दिवसापासून 33/11 केव्ही नवीन सब स्टेशन व्हावे अशी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश आल्याने शेतकऱ्यांचा हा अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न आज मार्गी लागला. तालुक्यात अजून असेच पाच सब स्टेशन होणार असून, शेतकऱ्यांना लाईनपासून वंचित राहावे लागणार नाही. या नवीन 33/11 केव्ही सब स्टेशन व एचटी लिंक लाईनचे काम पूर्ण झाल्याने चारही गावांना विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही. सब स्टेशनचे लोकांर्पण आ . बोरणारे यांच्याहस्ते पार पडले.

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, राष्ट्रवादी नेते एल.एम.पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पाटील शेळके, उपकार्यकारी अभियंता पांडव, माजी उपसभापती सुनील कदम, उपतालुकाप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, मोहन पाटील साळुंके, रावसाहेब पाटील मोटे, संचालक प्रशांत त्रिभुवन, महेश पाटील बुणगे, गणेश पाटील इंगळे, प्रशांत शिंदे, शंकर पाटील मुळे, दादासाहेब पाटील औताडे आदींसह ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments