Today news, शिवसेना, युवासेना व महिला आघाडी वैजापूरतर्फे आ.बोरणारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप


आ.रमेश बोरणारे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला "एक पेड माँ के नाम" अंतर्गत वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप


वैजापूर ता,26/ प्रतिनिधी - वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा.रमेश पाटील.बोरणारे यांच्या वाढदिवसानिमित्त आदल्या दिवशी पूर्व संध्येला शनिवारी (ता.26) येथील नगरपालिकेच्या श्री..स्वामी समर्थ विद्यालयात "एक पेड माँ के नाम" व "एक मुल -एक झाड' या शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपक्रमाअंतर्गत रोपटी लावण्यात आली तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आ.बोरणारे व माजी आमदार भाऊसाहेब पातील चिकटगावकर यांच्याहस्ते करण्यात आले. 
शिवसेना - युवासेना व महिला आघाडी वैजापूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या श्री.छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी बोलताना मा. नगराध्यक्ष साबेर भाई यांनी  आ. बोरणारे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आ.बोरणारे सारख्या अभ्यासू व कर्तृत्ववान आमदारांची वर्णी मंत्रीपदी नजीकच्या काळात निश्चितपणे लागणार आहे.माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर अभिष्टचिंतनावर बोलताना आ.बोरणारे म्हणाले की, मला मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी जनतेची कामे जबाबदारीने करीत राहणार. लोकांनी मला कामासाठीच निवडून दिले आहे ते प्रामाणिकपणे करीत राहणार.

आयोजक शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, युवा सेनेचे श्रीकांत साळुंके, श्रीराम गायकवाड, संतोष वाघ, शंकर मुळे यांच्यावतीने शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी आ.रमेश पाटील बोरणारे यांना शाल व पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक राजेंद्र पाटील साळुंके यांनी केले  तर सूत्र संचलन ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.  आभार युवासेनेचे श्रीकांत साळुंके यांनी मानले. 

या प्रसंगी शहराचे माजी पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक गुलाबराव साळुंके, वसंतराव साळुंके, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप , उत्तराव साळुंके, अण्णासाहेब शेळके, पोपट भोसले,  प्रकाश साळुंके, बाबुराव वाणी, रंजक शेटे, रामकीसन जोरे, सोपानराव निकम, ॲड.धरमसिंह राजपूत, रोडगे नाना, श्री.शेळके पाटील या सर्व जेष्ठतम नागरिकानी आ, रमेश बोरणारे यांचे अभिष्टचिंतन केले, .

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत  बिघोत, डॉ.राजीव डोंगरे, खुशालसिंह राजपूत, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, डॉ, निलेश भाटिया,कडॉ,संतोष गगवाल, डॉ,भांड, सखाहरी बर्डे, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन,  खलील मिस्तरी, वसंत त्रिभुवन, बबन त्रिभुवन, शालेय समितीचे राजेंद्र साळुंके, दिलीप गावडे, अशोकअण्णा चव्हाण, कयूम सौदागर, हमीद कुरेशी, जेष्ठ पत्रकार घन:श्याम वाणी, अमोल बोरनारे, रियाज कुरेशी, अशोक पवार खंडाळकर, बापू गावडे, मुख्याध्यापक आर.डी.वसावे, महिला आघाडीच्या सुलभा भोपळे, छायाताई बोरनारे, पदमाताई साळुंके, श्रीमती खैरनार, अनिता दाणे यांच्यासह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नगरपालिकेच्या सर्व शाळांच्या  जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments