Today news, राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी व गारपिटीच्या नुकसान भरपाईपोटी 337 कोटींची मदत

छत्रपती संभाजीनगर विभागात 67 हजार 462 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 59 कोटी 98 लाख रुपये मिळणार

मुंबई, ता.27 - यावर्षी फेब्रुवारी ते मे या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारने 337 कोटी 41 लाख 53 हजार रुपयांचा निधी मदत म्हणून वितरणास मंजुरी दिली आहे. ही मदत तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 
जमा केली जाणार आहे.


छञपती संभाजीनगर विभागात 67 हजार 462 शेतकऱ्यांची 34 हजार 542.46 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होती. त्यापोटी 59 कोटी 98 लाख 20 हजार रुपये, पुणे विभागातील 1 लाख 7 हजार 463 शेतकऱ्यांची 45 हजार 128.88 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती, त्यापोटी 81 कोटी 27 लाख 27 हजार रुपये, नाशिक विभागातील 1लाख 5 हजार 147 शेतकऱ्यांची 45 हजार 935.16 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती त्यासाठी 85 कोटी 67 लाख 8 हजार रुपये. कोकण विभागातील 13 हजार 608 शेतकऱ्यांच्या 4 हजार 473 .69 हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी 9 कोटी 38 लाख 24 हजार रुपये. अमरावती विभागातील 54 हजार 729 शेतकऱ्यांच्या 36 हजार 189.86 हेक्टर पिकासाठी 66 कोटी 19 लाख 11 हजार आणि नागपूर विभागातील 50 हजार 194 शेतकऱ्यांच्या 20 हजार 783.16 हेक्टर पिकासाठी 34 कोटी 91 लाख 63 हजार रुपये मंजूर झाले आहेत. मदतीची ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

दोन हेक्टर शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी करून एका हंगामात एका वेळेस व प्रचलित दराने मदत निधीचे वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मदतीचे वाटप झाल्यानंतर शेतकऱ्यांची नावे व मदतीचा तपशील जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 कर्ज व इतर खात्यात निधी वळविण्यास बंदी

भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली जाणार आहे.कर्ज खात्यात किंवा अन्य खात्यांमध्ये निधी वळवू नये असा स्पष्ट आदेश प्रशासनाकडून बँकांना देण्यात आला आहे. निधी वितरीत झाल्यानंतर शेतकऱ्यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे.



Post a Comment

0 Comments