today news, नगरपालिका हद्दीतही आता अनधिकृत बांधकामांवर कारवाई रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणार


रस्त्यांची संयुक्त मोजणी करून सीमांकन करा - जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश 

छत्रपती संभाजीनगर,ता.18/ प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात आले असून, आता नगरपालिका हद्दीतही मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक नगरपालिका हद्दीत रस्त्यांची भूमिअभिलेख आणि नगररचना विभागामार्फत संयुक्त मोजणी करून सिमांकन करून घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.17) नगरपालिका प्रशासन शाखेची आढवा बैठक झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, बी.यु. बिघोत, पी.पी.अंभोरे, समीर शेख,कारभारी दिवेकर, ज्ञानेश्र्वर ठोंबरे, संतोष आगळे आदी उपस्थित होते. बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0, नगरपालिकांमधील अनुकंपा पदभरती विभागीय परीक्षा,  घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण इत्यादी मुद्यांचा आढावा घेण्यात आला.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे त्यानिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरुळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे.
 त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर परिसरातील  रस्तेही मोकळे करणे आवश्यक आहे. त्यासाठी  रस्त्यांची मोजणी करून घ्यावी. जिल्हयातील इतर नगरपालिकांमध्येही संयुक्त मोजणी करून सीमांकन करून घ्या आणि पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळा.असे निर्देश स्वामी यांनी दिले. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी झीरो पेंडन्सी करावी, नावीन्यपूर्ण जनहिताचे उपक्रम राबवावे, विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणात आपली क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवावा ,प्रत्येक नगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा , ई -ऑफिसला चालना द्यावी, याशिवाय प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

Post a Comment

0 Comments