भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या उपस्थितीत शिबीर संपन्न
वैजापूर, ता.23 / प्रतिनिधी - भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. शहरातील भगवान महावीर रुग्णालय नगरपरिषद येथे आयोजित या शिबिरास भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्याहस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हजारो आयुष्याला जीवनदान देणाऱ्या या अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल वैजापुर भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आभार डॉ. दिनेश परदेशी यांनी आभार मानले व रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ असल्याने अनेक तरुण व सुदृढ लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण पाटील कवडे, सुरेश राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील गलांडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कंगले, धनंजय पाटील धोर्डे, कैलास पवार, सुरेश तांबे, मंजाहरी पाटील गाढे, दामोदर पारीख, प्रेम राजपूत, अनिता तांबे, शैलेश पोंदे, गौरव दौडे, भीमा साखरे, गणेश खैरे, शेख एराज, ज्ञानेश्वर शिरसाठ, विनोद राजपूत, यांच्यासह वैजापूर भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments