वैजापूर, ता.22 / प्रतिनिधी - जिल्हा परिषद गट आणि गण रचनेच्या प्रारूप आराखडयावर जिल्हयातून 25 आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या गट रचनेबाबत 25 आणि पंचायत समितीच्या गण रचनेबाबत 7 आक्षेपांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वैजापूर तालुक्यातून गट आणि गण प्रारूप प्रभाग रचनेबाबत एकही आक्षेप दाखल झालेला नाही.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून त्यावर सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. सोमवारी (ता. 21) सायंकाळपर्यंत जिल्हा परिषदेच्या गट रचनेबाबत 25 तर पंचायत समितीच्या गण रचणेबाबत 7 आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपांची छाननी होऊन सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांची नव्याने रचना होऊन त्याचा प्रारूप आराखडा 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये 63 गट आणि 126 गणांचा समावेश आहे.त्यावर सूचना व हरकती सादर करण्यासाठी 21 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी सायंकाळी संपली. या कालावधीत जिल्हयातून जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत 25 आणि पंचायत समितीच्या गण रचनेबाबत 7आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रारूप रचनेबाबत पैठण तालुक्यातून 8 तर कन्नड तालुक्यातून 7 आक्षेप दाखल झाले आहेत. वैजापूर व सोयगाव तालुक्यातून एकही आक्षेप दाखल झालेला नाही. पंचायत समितीच्या गण रचनेबाबतही जिल्हयात एकूण 7 आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्यामध्ये कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून प्रत्येकी दोन आक्षेप दाखल झाले आहेत. काहींनी जिल्हा तालुक्यात आणि जिल्हा पातळीवरही असे दोन ठिकाणी एकच आक्षेप नोंदविला आहे.
0 Comments