अंनिसच्या" चित्रफितीवरून भोंदूबुवावर पोलिसात गुन्हा
वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी- : जादूटोण्यांचा वापर करून भोळ्याभाबड्यांना वेड्यात काढणाऱ्या एका भोंदूबाबांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी दाखल केला आहे संजय रंगनाथ पगार रा.शिऊर ता.वैजापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील आरोपी हा सामान्य लोकांना आपल्या स्वयंघोषित जागृत स्थळावर बोलाऊन स्वतः देव असल्याचा बनाव करून उपस्थित पीडितांच्या दुःखाचे शोषण करण्याचा बहाणा करून त्यांना पायात असलेले बुट थोबडावर ठेऊन, हातातील ढोलकी वाजवून अलख निरंजन अलख निरंजन म्हणत पीडितांचा शारीरिक छळ करत असल्याचा व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाला होता. या अनुषंगाने पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याआधारे शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव रणखांब करीत आहेत.
0 Comments