छञपती संभाजीनगर - विट्स हॉटेल' खरेदी प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.गेल्या पांच वर्षात शिरसाठ यांच्या संपत्तीत 31 कोटींची वाढ झाली असून एवढी रक्कम आली कुठून याबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. शिरसाठ यांनी स्वतःच प्राप्तिकर विभागाच्या नोटीसची माहिती छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित चार्टर्ड अकाऊंटन्सच्या कार्यक्रमात बोलताना दिली.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दाखवलेली संपत्ती आणि 2024 च्या निवडणुकीत दाखवलेली संपत्ती यामध्ये तब्बल बारा पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे.
निवडणूक शपथपत्रानुसार , सन 2019 मध्ये शिरसाठ यांची संपत्ती 1 कोटी 31 लाख रुपये होती. ती सन 2024 मध्ये 13 कोटी 37 लाख रुपये झाली. त्यांची स्थावर संपत्ती 2019 मध्ये 1 कोटी 24 लाख रुपये होती.ती 2024 मध्ये 19 कोटी 65 लाख रुपये झाली.सन 2019 मध्ये त्यांच्याकडे 16 कोटी रुपये किमतीचे सोने होते. सन 2024 मध्ये 1 कोटी 42 लाख रुपये किंमतीचे दागिने असल्याचे नमूद केले आहे.
पाच वर्षात तुमच्या संपत्ती एवढी वाढली कशी विचारणा आयकर विभागाने नोटीस बजावत शिसाठ यांना केली आहे. नोटीसीला 9 जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते. दरम्यान, शिरसाठ यांनी उत्तर देण्यास वाढ वाढवून घेतल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिरसाठ कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात
मंत्री शिरसाठ यांचा मुलगा सिध्दांत याच्यावर विवाहित महिलेने केलेले आरोप, हॉटेल विट्स खरेदी प्रकरण, एमआयडीसीतील प्लॉट, शहरालगत सरकारी वर्ग दोनची जमीन आणि प्लॉट खरेदी आदी आरोपांमुळे शिरसाठ कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
0 Comments