विद्यार्थ्यांनी मोबाईलवर न राहता मैदानावर जास्त राहावे - न्यायधीश एन.एस. काळे
वैजापूर, ता. 05 / प्रतिनिधी -
वैजापूर तालुक्यातील जरुळ येथील माध्यमिक विद्यालयाला दिवाणी न्यायाधीश एन.एस.काळे यांनी शनिवारी (ता.05) विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सत्र आयोजित केले. या शिबिरात त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व, नागरिकांच्या हक्क व कर्तव्यांविषयी उपयुक्त माहिती दिली.
शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल वर न राहता मैदानावर जास्त राहावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी मार्गदर्शनपर भाषणात केले.
या कार्यक्रमाला ॲड. प्रवीण साखरे, ॲड. महेश कदम, ॲड.सोपान पवार, ॲड. शिंदे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.. सरपंच शोभाबाई मतसागर, श्री. सदाशिव मतसागर, मुख्याध्यापक श्री. तांबे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. अँड नुजहत बेगम, अँड ज्ञानेश्वर डगळे यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments