today news, श्रीक्षेत्र सराला बेट येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव

दुर्जनाला सन्मार्गाला लावणारे हे सदगुरु असतात -  महंत रामगिरी महाराज .


वैजापुर ता. 10/ प्रतिनिधी -
गुरूशिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठेच वैशिष्ट्य आहे. आज जे कोणी अध्या‍त्मविद्या जाणणारे संत सत्पुरुष आपल्याला दिसतात ते सर्व सद्‌गुरूशरण आहेत. शिष्याच्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश हे गुरुच दाखवतात, भारतीय इतिहासामध्येही मोठमोठे दुर्जन यांनाही महापुरुष सद्गुरु नीच सन्मार्गाला लावल्याचे अनेक उदाहरणे आहेत,प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे दैवी अवतारदेखील त्यांच्या मानवी लीलेमध्ये वसिष्ठ, सांदीपनी या गुरूंपुढे नतमस्तक झाले. आपण ही योगीराज गंगागिरी महाराज,ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांच्या पुढे नतमस्तक आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोदा धाम सराला बेटावर आज गुरू पौर्णिमेला भाविकांची अलोट गर्दी झाली होती.सकाळी ७ वाजता महंत रामगिरी महाराज यांनी सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज ,ब्रम्हलिन नारायणगिरी महाराजांच्या चरणपादुकांना जलाभिषेक करुन समाधिमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यावेळी गुरुस्तुतीपर आयोजित किर्तनातुन महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,अज्ञानरुपी अंधकारात ज्ञानाचा प्रकाश सदगुरू टाकतात, ज्ञान निर्माण करता येत नाही, ज्ञान नष्ट पण होत नाही, तसेच ज्ञान प्राप्त करता येत नाही तर सदगुरू ज्ञान प्रगट करून देतात ज्ञान शब्दाच्या पलीकडे असते, निष्काम भावनेने केलेले कार्य हे एक प्रकारची साधना आहे सदगुरू दिलेल्या मंत्र ज्याची जेवढी क्षमता आहे तेवढाच त्याला लाभ होतो गाईच्या दुधाचे महत्त्व वासराला कळते त्याप्रमाणे सद्गुरू समर्थ भक्तालाच कळते सद्गुरु शिष्यावर कृपा करतात वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी 200 वर्षापासून सुरू केलेली ज्ञानदानाचे  परंपरा त्यानंतर ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांनी मोठ्या प्रमाणावर त्यास गती दिली व आजतागायतही परंपरा अखंडपणे बेटावर सुरू आहे
सद्‌गुरूंचा केवळ देह म्हणजे सद्‌गुरू नव्हेत. सच्चिदानंद हे सद्‌गुरूंचे स्वरूप आहे. सत्शिष्यदेखील सद्‌गुरुकृपेने हा आनंद अनुभवतो. जो स्वतःला देह मानतो, तो या आनंदाला पारखा होतो. स्वतःला देह मानणे हे अज्ञान आहे. स्वतःला या देहापुरते सीमित केल्यामुळे तो असीम आनंद अनुभवण्याची क्षमता गमावून बसतो. खरोखर ही देहबुद्धीच सर्व दुःखांचे कारण आहे. देहबुद्धीलाच बोलीभाषेमध्ये 'मी' पणा अथवा अहंकार असे म्हणतात. जसे एखाद्या आईला आपल्या मुलाचे रडणे पाहावत नाही, लगेच ती त्याचे रडणे थांबवते. तसेच सद्‌गुरू मातृवत्सल असल्यामुळे त्यांना आपला शरणागत शिष्य दुःखी असल्याचे पाहावत नाही. ते आपल्या कृपाशक्तीने शिष्याच्या दुःखांचे कारण असलेली देहबुद्धी नष्ट करतात. त्याचा अहंकार नष्ट करतात, सद्‌गुरु कृपेशिवाय अध्यात्मविद्येचा प्रारंभच होत नाही सद्‌गुरू दयाळू असतात. ते मातृहृदयी असतात.  त्याने जन्मजन्मांतरीचा अहंकार नष्ट झाला. 'मी'पणा नष्ट झाला. सद्‌गुरुकृपेने स्वयंभू ज्योतिर्मयस्वरूप अनुभवास आले. सद्‌गुरुंनी स्वरूपाचे दर्शन घडवले. गुरुपौर्णिमेला आपण सद्‌गुरूंचे पूजन करतो. गुरु म्हणजे 'मोठा' जे आपल्याहून मोठे त्यांच्यापुढे नतस्तक व्हावे. त्यांचे पूजन करावे. सद्‌गुरूंच्या चरणी आपला 'मी'पणा अर्पण करावा. तेव्हाच या पौर्णिमेच्या पूर्णचन्द्राचे चांदणे आपल्या जीवनामध्ये पडेल असे सांगणारी ही गुरुपौर्णिमा आहे.असे महाराज म्हणाले आलेल्या भाविकांना आमदार रमेश पा बोरणारे सर व माजी आमदार भाऊसाहेब चिकट गावकर यांच्या वतीने  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, माजी आमदार भाऊसाहेब पा चिकट गावकर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी अर्थ बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, माजी सभापती बाबासाहेब जगताप, संजय पाटील बोरणारे, डॉ राजीव डोंगरे, बाबासाहेब पाटील चिडे, संजय पाटील निकम, विजय पाटील पवार, प्रशांत शिंदे, प्रदीप सांळुके दत्तु पाटील खपके, सराला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज, सराला बेटातील सर्व महाराज मंडळी यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments