जिल्हा व सत्र न्यायालय वैजापूर येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून एस.एच.आठवले हे नुकतेच रुजू.झाले. वकील संघ व वकील संघ सोसायटीच्या माजी पदाधिकाऱ्यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
वैजापूर जिल्हा तथा सत्र न्यायालय येथील सहाय्यक अधीक्षक उस्मान शेख यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी एस. एच. आठवले यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन अँड .सोपान पवार, वकील संघाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी सचिव अँड. मजहर बेग, अँड नुजहत बेगम, अँड.इमरान खान पठाण, अँड .सईद अली, अँड .संतोष गावडे आदींनी नवीन रुजू झालेले सहाय्यक अधीक्षक एस.एच.आठवले यांचा वकील संघातर्फे सत्कार केला.
0 Comments