today news, वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.नितेश शहा यांची निवड


डॉ.चैतन्य तांबे उपाध्यक्ष तर सचिवपदी डॉ.संदीप म्हस्के 

वैजापूर, ता. 06/ प्रतिनिधी -
आषाढी एकादशीचे औचित्य साधून वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. नितेश शहा यांची तर सचिवपदी डॉ.संदीप म्हस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
येथील प्रसिध्द सर्जन डॉ.एस. एम.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनची रविवारी (ता.06) बैठक होऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. डॉ. सुभाष भोपळे, डॉ.राजीव डोंगरे, डॉ. संतोष तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत निवडण्यात आलेली डॉक्टर्स असोसिएशनची कार्यकारिणी अशी -
अध्यक्ष - डॉ. नितेश शहा, उपाध्यक्ष - डॉ.चैतन्य तांबे, डॉ.भास्कर भांड, डॉ. बाबा इंगळे सचिव - डॉ. संदीप म्हस्के, कोषाध्यक्ष - डॉ. दर्शन शर्मा (पराशर)
कार्यकारिणी सदस्य - डॉ. नवनाथ सोनवणे, डॉ. गजकुमार संघवी, डॉ. एजाज शेख, डॉ. अमोल इंगळे, डॉ.नयन मोरे, डॉ.शरद साळुंके, डॉ. संदीप वऱ्हाडे, डॉ.रफिक शेख, महिला प्रतिनिधी - डॉ.नफिसा शबनम शेख
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य डॉ. एस.एम. जोशी, डॉ. सुभाष भोपळे, डॉ.राजीव डोंगरे, डॉ. अग्रवाल आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments