वैजापूर, ता. 07/ प्रतिनिधी -
दारुड्या पतीने किरकोळ घरगुती कारणवरून पत्नीच्या अंगावर थिनर टाकून तिला जाळून मारण्याचा अघोरीं प्रयत्न केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे एक जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान घडली. राणी सुनील कुऱ्हाडे असे या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या विवाहितेचे नाव असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या दोन्ही हाताला व छातीला भाजल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी राणी कुऱ्हाडे यांनी पोलिसांना हॉस्पिटलमध्ये दिलेल्या जवाबावरून पती सुनील मच्छिन्द्र कुऱ्हाडे याच्या विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील गाजगांव येथील रहिवासी असलेल्या राणीचे लग्न ७ जुलै २०२२ रोजी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील सुनील कुऱ्हाडे याच्याशी झाले होते. राणी पत्नी सुनील, सासू, दीर व दोन मुलांसह परसोडा येथे राहत आहेत. सुनील हा मजुरीचे काम करतो पण त्यास दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नी राणीला मारहाण करत तसेच दीर व सासुही किरकोळ कारणावरून राणी हिस शारीरिक व मानसिक त्रास देत असत.
एक जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजेल सुनील कामावरून घरी आला व त्याने किरकोळ कारणवरून वाद घातला व त्यानंतर घरातील थिनर अंगावर टाकून पेटवून दिले. त्यावेळी मावस भाया मनोज गुंजाळ याने अंगावर गोधडी टाकल्याने आग विझली. जखमी अवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी पती विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments