Today news, 'काम हीच पूजा' हे संत वचन पाळून मी सदैव लोकांसाठी कार्यरत - आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर, ता .24 / प्रतिनिधी - जनतेने मला तालुक्याच्या विकासासाठी निवडून दिलेले आहे, हे ध्यानी मनी ठेऊन मी सातत्याने काम करीत आहे. संत शिरोमणी सावता महाराज जसे कष्टामध्ये देव पाहत होते तसे मी जनतेच्या हिताच्या कामामध्ये देव पाहत कार्यरत आहे व यापुढेही राहणार असे प्रतिपादन आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी गुरुवारी (ता,24) येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमात केले. 

शहरातील आंनंदनगरमधील संत सावता महाराज मंदिर  परिसरात आ. बोरणारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे.यांच्याहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आ.बोरणारे बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नगरविकास विभागाअंतर्गत मिळणाऱ्या निधीतून आ.बोरणारे यांनी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला व सभागृह उपलब्ध करून दिले. या मंदिराचा परिसर संरक्षण भिंत बांधून लवकरच विकसित करणार असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
सुरुवातीला शहर व परिसरातील समस्त माळी समाज बांधवांनी माळी गल्ली येथील श्री.संत सावता महाराज यांच्या मंदिरापासून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. आनंदनगर येथे याचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी भांगशी माता गडाचे महंत श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांचे प्रवचन तर ह.भ.प. अशोक महाराज सत्रे यांचे काल्याचे कीर्तन होऊन उपस्थित सर्व भक्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दौलतराव गायकवाड यांनी तर सूत्र संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत  यांनी केले.  सजनराव गायकवाड व गौतम गायकवाड यांनी आभार मानले. .याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, डॉ.राजीव डोंगरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर,   शिवसेनेचे शहरप्रमुख पारस घाटे, युवासेनेचे श्रीराम गायकवाड, महिला आघाडीच्या छाया बोरनारे, संगीता अहिरे,  सुनीता साखरे, मंजुषा पुणे, निशा गोरक्ष, संगीता ठोंबरे, श्रीमती लोढा  दशरथ बनकर, महेश भालेराव, वसंत त्रिभुवन, डीके पाटील,युवा सेनेचे श्रीराम गायकवाड. बाबासाहेब पुतळे,अक्षय कुलकर्णी, शंकर शेळके, भाऊलाल सोमासे, रतीलाल गायकवाड, तुकाराम गौयकवाड ,बाळू गायकवाड , उत्तमराव आहेर, सुनील गायकवाड, विलास गायकवाड, भास्कर गायकवाड, श्रीकांत गायकवाड, संतोष कोंडीराम गायकवाड, मॅचिंद्र गायकवाड यांची उपस्थिती होती. श्रीमती कमळाबाई गायकवाड व सीताबाई गायकवाड यांनी विशेष सहाय्य केले म्हणून त्यांचा मंदाबाई गायकवाड, सुमनबाई गायकवाड, जिजाबाई गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.शेवटी गौतम गायकवाड यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments