वैजापूर, ता.18 / प्रतिनिधी -
शहरातील शिवप्रतापनगर ते व्यंकटेशनगर या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेतून ९० लाखांचा निधी मंजूर झाला होता. राज्य शासनाकडे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्यानंतर या कामाचे उदघाटन मंगळवारी (१५ जुलै) करण्यात आले. माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते व मान्यवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या रस्त्यामुळे शहराच्या विकासात आणखी भर पडणार असल्याचे शिल्पा परदेशी यांनी याप्रसंगी सांगितले.
नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात डॉ. दिनेश परदेशी व त्यांच्या पत्नी शिल्पा परदेशी यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक विकासात्मक कामे केली. स्वच्छता, रस्ते,पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व
शहरवासीयांच्या असलेल्या दैनंदिन गरजांसाठी प्रामाणिकपणे सातत्याने त्यांनी काम केले आहे. त्या अनुषंगाने या कामामुळे नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मुख्याधिकारी बी.यु.बिघोत, विशाल संचेती, अविनाश गलांडे, हाजी
अकील शेख, मंजाहरी गाढे, जयमाला वाघ, पंकज ठोंबरे, मज्जिद कुरेशी, प्रभाकर बारसे, मोहन आहेर, सुनिल पैठणपगारे, राजेश गायकवाड, प्रशांत कंगले, दशरथ बनकर, संदीप ठोंबरे, सुरेश राऊत, साहेबराव औताडे, ज्ञानेश्वर जगताप, कचरू डिके, नारायण कवडे, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, बद्री अण्णा गायकवाड, रजनिकांत नजन, सचिन जानेफळकर, भाऊसाहेब गलांडे, धनंजय अभंग, जितेंद्र पवार, सुरेश तांबे, इम्रान कुरैशी, काजु काझी, शैलेश पोंदे, प्रेम भाऊ राजपूत, सोनु राजपूत, विनोद राजपूत, गौरव दोडे, महेश भालेराव, शिवलिंग साखरे, गिरीश चापानेरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments