crime news, वैजापूर - येवला रस्त्यावर वाटमारी करणारा अटकेत ; स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई


वैजापूर, ता .01/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वैजापूर तालुक्यात येवला रस्त्यावर वाटणारी करणाऱ्या एकास शनिवारी (30) जेरबंद केले. दिगंबर हरिश्चंद्र निकम असे त्याचे नाव असून तो तालुक्यातील जरूळ येथील रहिवासी आहे. त्याने एका साथीदाराला सोबत घेऊन दोन वर्षांपूर्वी शुभम चंद्रभान रोठे (रा. भालगाव, तालुका येवला) हे दुचाकीवर जात असताना त्यांना येवला रस्त्यावर राधिका हॉटेलसमोर अडवून धाक दाखवत पॉकेट, मोबाईल व दुचाकी हिसकावून पळ काढला होता. 

याबाबत रोठे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना माहिती मिळाली की हा गुन्हा जरूळ येथील दिगंबर निकम याने केला आहे. शोध घेऊन दिगंबर निकम यास जेरबंद करण्यात आले. त्याने गुन्हा कबूल केला असून याप्रकरणी पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, एपीआय पवन इंगळे, अंमलदार वाल्मिक निकम, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, योगेश तरमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments