news today, 'समृध्दी' वर मराठा आंदोलकांची कार उलटली ; पाच जण जखमी

वैजापूर - लासूर दरम्यान घटना ; जखमी फुलंब्री तालुक्यातील खामगांव येथील रहिवाशी 

वैजापूर, ता, 01 -  मुंबईहून परतणाऱ्या मराठा आंदोलकांना घेऊन जाणारी भरधाव कार अचानक उलटून पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरील वैजापूर - लासूर दरम्यान घडली. राजू चव्हाण (वय 38 वर्ष , संजू बगळे (वय 31 वर्ष ), मधुकर सोनवणे (वय 32 वर्ष ), एकनाथ राठोड (वय 37 वर्ष), एकनाथ काटकर अशी जखमींची नावे असून ते फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील रहिवासी आहेत.

मुबई येथे सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनातून मराठा आंदोलक शनिवारी दुपारी एक वाहन क्रमांक (एम.एच. 20 डी.व्ही. 5112) ने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, वैजापूर लासूर दरम्यान चॅनेल गेट क्रमांक 468.3 जवळ कार चालकाने मागून एका अज्ञात वाहनाला धडक दिली. घटनेची माहिती मिळताच, महामार्गावर असलेले बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना गाडीत पाच जण जखमी अवस्थेत आढळले. जोरदार धडकेमुळे गाडी उलटली. त्यामुळे गाडीतील पाचही जण गंभीर जखमी झाले. त्यांना वैजापूरच्या रुग्णवाहिकेने तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. रस्त्याच्या मधोमध पडलेली गाडी उचलून बाजूला करण्यात आली.  त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Post a Comment

0 Comments