वैजापूर, ता 01/ - राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केली .ही घटना तालुक्यातील लाख खंडाळा येथे शनिवारी (ता.30) सायंकाळी घडली. गणेश रत्तन कदम (25 वर्ष) असे मयत युवकाचे नाव आहे.
गणेश हा बांधकाम मजूर म्हणून काम करत होता.
दोन दिवसांपूर्वी त्याची मोटारसायकल व मोबाईल वैजापूर शहरातून चोरी झाला होता. मोटारसायकलचा तो शोध घेत होता. परंतू मोटारसायकल मिळाली नाही. त्यामुळे त्याचे काम देखील बुडाले होते. त्यातच मोबाईल देखील चोरीला गेलेला असल्याने त्याचा संपर्क तुटल्याने त्याला काम देखील मिळाले नव्हते. त्यामुळे नैराश्य आल्याने त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. रात्री गावी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार कुलदीप नरवडे हे करीत आहेत.
0 Comments