news today, वैजापूर शहरात भव्य व आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना ; गणेश भक्तांनी रस्ते फुलले

म्हसोबा मित्रमंडळाने उभारली कुबेरेश्वर धाम महादेवाची प्रतिकृती


वैजापूर, ता. 01/ प्रतिनिधी -  यंदा वैजापूर शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळानी अतिशय भव्य व आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या थीमचा वापर करत आकर्षक आरास व सजावट करण्यात आल्याने हे देखावे पाहण्यासाठी पहिल्या दिवसांपासून गणेश भक्तांनी रस्ते फुलायला लागले आहेत. 


म्हसोबा मित्र गणेश मंडळाने म्हसोबा चौकात साकारलेला शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर येथील कुबेरेश्वर धाम महादेव मंदिराचा देखावा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. कुबेरेश्वर धाम महादेव मंदिराची अगदी हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली असून या मंदिरात बाप्पाची देखणी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. याशिवाय स्टेशन रस्त्यावरील अनेक मंडळानी लक्षवेधी सजावटी केल्या आहेत. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरात महायोद्धा प्रतिष्ठाण, वैजापूरचा राजा यां मंडळाने मंदिराची विदयुत रोषणाईने झळकत असलेली प्रतिकृती उभारली असून त्यात भव्य श्री गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. तसेच रामराज्य ग्रुपने अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या परिसरात असलेल्या शिवस्य गणेश मंडळ, बालराज ग्रुप, मोरया ग्रुप, हिंदू प्रतिष्ठाण ग्रुप या मंडळानीही आकर्षक सजावट करून गणेश भक्तांचे लक्ष वेधले आहे. हिंदू प्रतिष्ठाण ग्रुपने हिरवाईत गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशाचा संदेश दिला आहे. मोरया गणेश मंडळानेही यंदा जंगलात गणेश मूर्तीची स्थापना केल्याचा देखावा सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments