वैजापूर, ता.10/प्रतिनिधी - श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वैजापूरतर्फे उपवास सिध्दीतम तपस्वी यांचा रविवारी सकाळी (ता.31) शहरातून शोभायात्रा काढून सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र प्रवर्तीनी डॉ.पू.श्री ज्ञानप्रभाजी म.सा.की सुशिष्या तपस्वीरत्न पू.श्री. पुष्पचुलाजी म.सा. व पू. श्री. सुप्रियदर्शनाजी म.सा. ठाणा 5 यांच्या सानिध्यात 45 अराधक सिध्दीतप पूर्ण करणाऱ्या उपवास तपस्वी यांची सकाळी आठ वाजता शहरातील पंचायत समितीपासून शोभायात्रा काढण्यात आली. टिळक रोड मार्गे शोभायात्रा शहरातील स्व.बन्सीलाल रुपचंद संचेती जैन स्थानकात पोहचल्यानंतर तेथे सिध्दीतप सन्मान सोहळा पार पडला. त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.
या सिध्दीतप सन्मान समारोहात जैन साध्वीसह माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिल्पाताई परदेशी, मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, मेजर सुभाष संचेती, प्रकाशसेठ बोथरा, विशाल संचेती, अमृतलाल बोथरा, राजेंद्र संचेती, प्रफुल्ल संचेती, सुरेंद्र संचेती, पारसमल संचेती, निलेश पारख, राजेंद्र पारख, दिपक संचेती, रुपेश संचेती, गौतम संचेती, महावीरसेठ बाफणा, आनंद संचेती, अनिल धरमचंद संचेती, मनोज संचेती, प्रा.जवाहर कोठारी, नंदलाल मुगदिया, शांतीलाल संचेती, आनंदीलाल बोथरा, महेश पारख यांच्यासह जैन समाजातील महिला व पुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments