news today, जातेगांव घाटात ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन महिला भाविक ठार, तर 13 जण गंभीर जखमी

वैजापूर, ता.18 /प्रतिनिधी - नांदगांव तालुक्यातील जातेगांव पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिनाकेश्र्वर महादेव घाटात भाविकांचा ट्रॅक्टर व ट्रॉली सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 13 जण गंभीर जखमी झाले. रविवारी (ता.17) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात कांताबाई नारायण गायके वय 56 वर्ष रा. खामगांव ता.कन्नड व कमलबाई शामराव जगदाळे वय 62 वर्ष रा. जानेफळ ता.वैजापूर या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments