news today, सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद घेण्यासाठी 2 हजारांची लाच घेतांना अंचलगांवचा तलाठी सापड्यात अडकला

वैजापूर, ता.06 /प्रतिनिधी - सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेतांना आंचलगांव सजाचा  तलाठी गोविंद रामचंद्र सबनवाड (वय 54 वर्ष) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाभुळतेल ता.वैजापूर शिवारात तक्रारदार यांची गट क्रमांक 242 मध्ये शेत जमीन समाईक क्षेत्र 52 आर.आहे.. सदर वडिलोपार्जित क्षेत्रावरील हक्कसोड प्रमाणपत्रावरून फेर घेऊन उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांचे आईचे नावाने जमिनीचे कागदपत्राची फाईल आंचलगाव सजाचे तलाठी गोविंद रामचंद्र सबनवाड (वय 54 वर्ष) यांच्याकडे दिली होती. 6 ऑगस्ट 2025 रोजी तक्रारदार यांनी तलाठी सबनवाड यांना भेटून जमिनीची फेर मध्ये नोटीस काढण्यासाठी विचारपूस केली असता सबनवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयाची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लोणी खुर्द येथील श्रीकृष्ण मल्टी सर्व्हिस या झेरॉक्स दुकानात तक्रारदार यांच्याकडून दोन हजारांची लाच घेताना तलाठी सबनवाड यास रंगेहाथ पकडले असून त्याच्या जवळील रेड मी कंपनीचा मोबाईल आणि 6390/- रुपये रोख व लाचेची रक्कम दोन हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. आरोपीची घरझडती प्रक्रिया सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे, उप अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे, पोलीस अंमलदार भीमराव जीवडे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments